Headlines

कुडाळ रोटरी क्लबचे कार्य आदर्शवत…

सुहास जोशी:कुडाळ रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न..

⚡कुडाळ ता.०२-: विविध क्षेत्रात कुडाळ रोटरी क्लबने आदर्शवत काम केले आहे, असे गौरोवोद्गार पदग्रहण अधिकारी रो.डॉ. सुहास जोशी यांनी काढले. बुधवारी सायंकाळी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून मकरंद नाईक, सेक्रेटरी म्हणून राकेश म्हाडदळकर आणि खजिनदार म्हणून डॉ. जयश्री केसरे यांच्यासह नूतन कार्यकारिणीने पदग्रहण केले.
दिनांक १ जुलै रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारणीचा पहिला दिवस असतो. या दिवशी कुडाळ रोटरी क्लबच्या नवीन टीमने अध्यक्ष रो. मकरंद नाईक, सेक्रेटरी रो. राकेश म्हाडदळकर, खजिनदार म्हणून रो. डॉ. जयश्री केसरे तसेच कुडाळ क्लबच्या संचालक मंडळातील विविध पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण केले. हा पदग्रहणाचा दिमाखदार सोहळा महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे पदग्रहण अधिकारी रो.डॉ. सुहास जोशी सांगली यांच्या उपस्थितीत पार पडला. पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर रो. संजय रावराणे हे देखील उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रणय तेली, असिस्टंट गव्हर्नर रो. अभिषेक माने तसेच जिल्ह्याभरातून आलेल्या सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी सदस्य, पत्रकार उपस्थित होते. कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांची देखील या सोहळ्यास विशेष उपस्थिती होती.
अतिशय दिमाखदार पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला. मावळते अध्यक्ष रो. राजीव पवार यांनी आपण वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच नवीन अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी आपण पुढील वर्षभरात विविध उपक्रम राबविणार आणि कुडाळ रोटरी क्लबचे नाव अजून मोठ करणार याची ग्वाही दिली. तसेच रोटरी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कुडाळ क्लबच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
दिवसभरात कुडाळ रोटरी क्लबने विविध उपक्रम राबवले. त्यात प्रामुख्याने कुडाळ क्लबच्या वतीने वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
तसेच डॉक्टर्स डे च्या निमित्ताने विविध डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यात प्रामुख्याने डॉक्टर जी टी राणे, डॉ. संजय केसरे, डॉ. जयश्री केसरे, डॉ. रवींद्र जोशी, डॉ. संजय सावंत, डॉ. शिल्पा पवार, डॉ. सायली प्रभू तसेच इतरही डॉक्टरांचा सहभाग होता. तसेच चार्टर्ड अकाउंटंट डे च्या निमित्ताने सीए गजानन प्रभू , सीए सुनील सौदागर, सीए सागर तेली, सीए शैलेश मुंडये अशा विविध चार्टर्ड अकाउंटंटचा देखील सत्कार करण्यात आला.
आजच्या पदग्रहण सोहळ्याचे औचित्य साधून घावनळे खुटवळवाडी येथील कृष्णा विले यांना रोटरी व्होकेशनल अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूरच्या मुख्याध्यापिका सौ सुनीती नाईक मॅडम यांना कुडाळ रोटरी क्लबच्या वतीने ज्ञानज्योती अवार्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये कुडाळ क्लबच्या वतीने ओरोस येथील डॉन बॉस्को शाळेसाठी दोन प्रिंटर भेट देण्यात आले.
तसेच श्री लिंगेश्वर विद्यालय तुळसुली या शाळेमध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या सोनिया आनंद झोरे या मुलीला पुढील शिक्षणासाठी रोख रुपये ५ हजारची आर्थिक मदत करण्यात आली. पावशी येथे राहणारे डॉ. बापू भोगटे यांना रोटरी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुडाळवासियांच्या सेवेत स्वखर्चाने वैकुंठ रथ समर्पित करणारे माजी नगराध्यक्ष रो. ओंकार तेली यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page