⚡कणकवली ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. काही नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. तर कणकवली तालुका अध्यक्षपदी प्रदीप मांजरेकर यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच देवगड तालुकाध्यक्षपदी उमेश कुलकर्णी, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष वैभव वेंगुर्लेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, दोडामार्ग तालुकाध्यक्ष गुणाजी गवस यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली आहे.
कणकवली काँग्रेस तालुकाध्यक्षपदाची धुरा प्रदीप मांजरेकर यांच्याकडे…
