Headlines

मालवणात ४ रोजी विजयाबाई मेहता यांची श्रद्धांजली सभा

मालवण (प्रतिनिधी)

ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका विजयाबाई मेहता यांचे निधन झाल्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मालवण यांच्यावतीने शनिवार दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता नगर वाचन मंदिर सभागृह, मालवण येथे विजयाबाई मेहता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या श्रद्धांजली सभेला मालवणातील सर्व रंगकर्मींनी उपस्थित राहून आपला भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मालवणचे कार्यवाह संजय शिंदे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page