मराठा आरक्षणासाठी उभा केलेला लढा असताना अशावेळी जिल्ह्यात कार्यक्रम करणे चुकीचं…

मंत्री दीपक केसरकर: उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; शरद पवार यांना भेटायला जाण्याची ही माझी पूर्वनियोजित भेट…

⚡सावंतवाडी ता.२९-: जरांगे पाटील यांचा उपोषण स्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या त्यांची भेट घेतील किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे त्यांचा शी संवाद साधून उपोषण उठवतील‌. त्यामुळे आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित असणे महत्त्वाचा आहे तसेच मराठा आरक्षणासाठी उभा केलेला लढा असताना अशावेळी जिल्ह्यात कार्यक्रम करणे चुकीचं त्यामुळे उद्या वेंगुर्ला येथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करत मुंबईला जात आल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान शरद पवार यांना भेटायला जाण्याची ही माझी पूर्वनियोजित होती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहीत होते त्यामुळे अशात न काही वेगळ्या देखील चर्चा बाहेर येत असतात असे केसरकर यावेळी बोलताना म्हणाले.ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.

You cannot copy content of this page