स्पीकर ची वायर काढत असताना शॉक लागल्याने बिहार येथील कामगाराचा मृत्यू…
⚡कणकवली ता.२६-: हुंबरठ दळवीवाडी येथील सेंट्रींग कामगार रोहितकुमार भुट्टीप्रसाद (३०, मूळ रा. बिहार) याचा स्पीकरच्या वायर काढताना शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर अनिल बिजली प्रसाद याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. रोहितकुमार भुट्टीप्रसाद हुंबरठ येथे सेंट्रींगचे काम करत होता. सोमवारी धुलीवंदन निमित्ताने कामगारांनी स्पीकर बॉक्स लावले…
