अरविंद केजरीवाल अटक प्रकरणी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार…

संयुक्त पत्रकार परिषदेत दिली माहिती:आ नाईक, अमित सामंत, संजय पडते, विवेक ताम्हणकर यांचा इशारा

⚡कुडाळ ता.२६-: कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावलीय. कथित मद्य धोरण प्रकरणात १०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीतर्फे रस्त्यावर येऊन आंदोलन छेडण्यात येईल. याबाबतची माहिती आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी (शरद पवार गट) अमित सामंत, आपचे जिल्हाप्रमुख विवेक ताम्हणकर, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे ती केवळ भाजपची
दडपशाहीच्या, हुकूमशाही आहे.
महाराष्ट्रात भाजपचे खासदार निवडून येणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपकडून विरोधकांवर कारवाई केली जात आहे. दडपशाहीला भीक न घालता आम्ही विरोधक मागे हटलो नाहीत. देश दहशतवादाकडे जात आहे. निवडणुकीच्या मैदानातून बाहेर ठेवण्यासाठी केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे. ईडीने भाजपच्या दबावाखाली हे काम सुरू केले आहे. भाजप विरोधकांना संपवित आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

You cannot copy content of this page