रुपेश राऊळ यांचा टोला:केसरकांनी गद्दारी, विश्वासघात, या पाठांचा तिसरी आणि चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करावा..
⚡सावंतवाडी ता.२६-: तवा गरम दिसला की तिथे आपली पोळी भाजून घ्यायची ही केसरकरांची वृत्ती आहे,सध्या राणेंचा तवा गरम आहे म्हणून केसरकर सध्या त्यांची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत,असा टोला ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे लगावला.
दरम्यान गद्दारीचा धडा केसरकारांनीच दिला आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी गद्दारी, विश्वासघात ,असे धडे त्यांनी तिसरी व चौथीच्या पाठ्यपुस्तकात घ्यावेत असा टोला देखील श्री.राऊळ यांनी यावेळ लगवला.ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषद बोलत होते.
