मालवणात मनसेतर्फे पर्यावरण पूरक रंगांचे वाटप…

⚡मालवण ता.२६-: धुलीवंदन म्हणजेच निरनिराळ्या रंगांची उधळण करून आनंद साजरा करण्याचा दिवस. मात्र यासाठी वापरण्यात येणारे रंग काही वेळा आरोग्यासाठी हानिकारक ठरत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मालवण शहराच्या वतीने पर्यावरण पूरक रंगांचे वाटप करण्यात आले.

धुलीवंदनच्या उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन त्यांनी रंग उधळीत आनंद लुटावा घ्यावा, या हेतूने पर्यावरण पूरक रंगांचे वाटप करण्यात आले. यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर, सागर जाधव, गुरू तोडणकर आणि नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page