हळवल येथे २८ मार्च ला शिवजन्मोत्सव सोहळा…

शिवजयंती उत्सव मंडळ हळवलचे आयोजन..

⚡कणकवली ता.२६-: शिवजयंती उत्सव मंडळ हळवल च्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्च २०२४ रोजी हा शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी ९:३० वाजता शिवप्रतिमेचे पूजन, सकाळी १०:३० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२:०० वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७:०० वाजता हरिपाठ, रात्री ८:३० वाजता मान्यवरांचा सत्कार व आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान समारंभ, रात्री ९:०० वाजता बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कवठी, तालुका – कुडाळ यांचे दशावतारी नाटक, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाना आपण उपस्थित रहावे असे आवाहन शिवजयंती उत्सव मंडळ हळवलच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page