⚡कणकवली ता.२६-: हुंबरठ दळवीवाडी येथील सेंट्रींग कामगार रोहितकुमार भुट्टीप्रसाद (३०, मूळ रा. बिहार) याचा स्पीकरच्या वायर काढताना शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर अनिल बिजली प्रसाद याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.
रोहितकुमार भुट्टीप्रसाद हुंबरठ येथे सेंट्रींगचे काम करत होता. सोमवारी धुलीवंदन निमित्ताने कामगारांनी स्पीकर बॉक्स लावले होते. दिवसभर नाचून, रंगांनी खेळून झाल्यावर रात्री जेवण करून झाल्यावर झोपायला जात असताना स्पीकर काढले नाही आहेत हे त्या कामगारांच्या लक्षात आले. ते स्पीकर काढण्यासाठी रोहितकुमार भुट्टीप्रसाद हा काढण्यासाठी गेला असता मेन स्वीच बंद न केल्याने त्याला शॉक लागला. तेथील कामगारांच्या हे लक्षात येताच त्यांनी रोहितकुमार भुट्टीप्रसाद त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. संकलित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचे नोंद करण्यात आली आहे.
