⚡मालवण ता.२६-: जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, ऍग्रो टुरिझम, रिसॉर्ट, रिक्षा व्यावसायिक, टुरिस्ट व्हेईकल व्यावसायिक क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे पर्यटन व्यावसायिकांची दि. २८ मार्च रोजी दुपारी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीमध्ये युनिट्सचे निवास सर्वेक्षण निधी पोर्टल नोंदणीसाठी तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत स्वदेश दर्शन 2.0 चे सिंधुदुर्ग येथील प्रकल्प समन्वयक श्री. मंदार हाडके हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांना व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे. पर्यटन व्यावसायिकांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन शस्वदेश दर्शन समिती सदस्य तसेच पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केले आहे.
