रुपेश राऊळ यांचा सवाल:ज्यांच्या जीवावर मोठे व्हायचे त्यांना धडा शिकवायचा हि केसरकर यांची संस्कृती..
⚡सावंतवाडी ता.२६-: खासदार राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे विकास कामे मंजूर झाली त्याच विकास कामांचे नारळ आम्ही फोडले मात्र दीपक केसरकर यांनी आज पर्यंत भूमिपूजन केलेली किती विकास कामे मार्गी लागली हे सांगावे,असा सवाल ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केले.दरम्यान रघुनाथ मार्केट येथील प्रकल्प, गार्डन मधील मनोरेले आधी प्रकल्प कुठे आहे त्यामुळे केसरकर यांनी विकास कामाबाबत राऊत यांच्यावर बोलू नये. मुळात चर्चेत राहण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने केवळ विनायक राऊत यांच्यावर टीका करायची आणि नारायण राणे यांची जवळीक साधायची हाच एक कलमी कार्यक्रम सध्या त्यांनी सुरू केला आहे. असा टोला देखील त्यांनी यावेळी हाणला.
श्री राऊळ म्हणाले, केवळ खासदार विनायक राऊत यांच्या शिफारसीमुळे दीपक केसरकर हे मंत्री होऊ शकले त्यामुळे उपकाराची भाषा केसरकर यांनी बोलू नये मुळात गद्दारी विश्वासघात धडे आजपर्यंत केसरकारांनीच गिरवले आहेत. त्यांनी राजकीय मित्र असलेले माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा राजकीय बळी घेत स्वतः मोठे होऊन प्रकारे मैत्रीचा गळा घोटावा हे दाखवून दिले त्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेत नारायण राणे यांचा उदो उदो करत नगराध्यक्षपद गळ्यात पाडून घेतले पुढे जाऊन ते त्यांच्यावरच उलटले. त्यानंतर माझे राजकीय गुरू म्हणून शरद पवार यांनाही शिष्याची राजकीय चाल कशी आहे हे दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांना देव माणूस म्हणून देवाचा नवस कसा फेडायचा हे दाखवून दिले. एवढेच नाही तर सहभारातही शिवराम भाऊ जाधव यांच्यासोबत गद्दारी केली त्यामुळे ज्यांच्या जीवावर मोठे व्हायचे त्यांना धडा शिकवायचा हि केसरकर यांची संस्कृती झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता गद्दारी विश्वासघात उपकाराची जाण अशा प्रकारचे धडे शालेय शिक्षण मंत्री म्हणून पाचवी सहावीच्या अभ्यासक्रमात आणावेत. असा टोला देखील त्यांनी यावे लगावला.
