लोकसभा मतदार संघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही..

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची माहिती:सिंधुदुर्गातील निवडणुकीसंदर्भात घेतला आढावा..

ओरोस ता.२६-:

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकूण १९४० मतदान केंद्रे निश्चित झाली आहेत. यातील एकही मतदान केंद्र संवेदनशील नाहीत. तसेच या निवडणुकीत उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा असल्याची माहिती लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ पुर्वतयारी आढावा बैठक नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, परिविक्षाधीन आय ए एस श्रीमती जस्मिन, अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र मठपती, निवासी उपजिल्हाकारी मच्छिंद्र सुकटे, सिंधुदुर्ग निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, रत्नागिरी निवडणूक उपजिल्हाधिकारी राहूल गायकवाड उपस्थित होते. यानंतर एम देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन निवडणूक प्रक्रिया शांततेत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन केले. तर जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून मा. निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार विविध समित्यांची व पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण शिबींराचेही आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page