Headlines

देवगड बंदरात नौका बुडाल्याने वीस लाखाचे नुकसान…

आज पहाटेची घटना:आठ पैकी सात खलाश्यांना वाचविण्यात यश एक खलाशी अजून बेपत्ताचं… ⚡देवगड ता.३१-: देवगड समुद्रात १० वाव पाण्यात तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका बुडाली असून या नौकेवरील ८ पैकी ७ खलाश्यांना वाचविण्यात यश आले असून एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे. ही घटना रविवार ३१ मार्च रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. उपलब्ध…

Read More

उपक्रमांमुळे मुलांना संस्काराचे बाळकडू मिळेल – शिवानी आळवे…

⚡वेंगुर्ला ता.३१-: आजकाल इंग्रजी शाळेकडे पालकांचा ओढा वाढलेला असताना सुद्धा शिशुवाटीकेमध्ये मुलांना दाखल करणा-यांची संख्या काही कमी नाही. शिशुवाटीकेमधील मुलांच्या पालकांनी उचललेले हे पाऊल अतिशय योग्य दिशेने आहे. याठिकाणी घेत असलेल्या विविध उपक्रमांमुळे मुलांना निश्चित संस्काराचे बाळकडू मिळेल असे प्रतिपादन पंचायत समिती वेंगुर्ला येथील समग्र शिक्षा अभियान, गट साधन केंद्राच्या विषयतज्ञ शिवानी आळवे यांनी केले.

Read More

वसुंधरा नेरुरपार येथे पारंपारिक भरडधान्य महत्त्व व संवर्धन कार्यक्रम संपन्न…

⚡कुडाळ ता.३१-: कळसूबाई मिलेट्स नाशिक यांच्या सौज्यन्याने निसर्ग संवाद उपक्रमातून पारंपारिक भरडधान्य महत्त्व व संवर्धन हा कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ मार्च २०२४ रोजी वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे संपन्न झाला.यावेळी कळसुबाई मिलेट्सचे संस्थापक नाशिक येथील श्रीम. नीलिमा जोरावर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांचे भरडधान्य महत्त्व व संवर्धन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान…

Read More

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत चमक…

⚡बांदा ता.३१-: गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेच्या दहा विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत चमकदार कामगिरी केली.जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेत शाळेतून ५०हून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या परीक्षेत इयत्ता चौथीतील दुर्वा दत्ताराम नाटेकर…

Read More

आंध्रप्रदेश मध्ये होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या कारवाई…

४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त: काळोखाचा फायदा घेत चालक फरार.. ⚡बांदा ता.३१-: गोव्यातून आंध्रप्रदेश मध्ये होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या भरारी पथकाने कारवाई करत ४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज पहाटे पत्रादेवी येथील अबकारी खात्याच्या तपासणी नाक्यावर करण्यात आली. काळोखाचा फायदा घेत चालक फरारी होण्यात यशस्वी झाला.भरारी पथकाने…

Read More

रोणापामध्ये 3 रोजी रक्तदान शिबिर…

⚡बांदा ता.३१-: माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल आयोजित दि. 3 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मडुरा तिठा येथील सावित्री शंकर मंगल कार्यालयात शिबिरास सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. रोणापाल गावासह पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजवंत रुग्णांना जीवनदान द्यावे असे आवाहन, श्री देवी माऊली…

Read More

विशाल परब यांच्याकडून शिरोडावाशियांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा…

गांधीनगर येथे पाणीटंचाई; ग्रामस्थांनी केली होती मागणी वेंगुर्ला ता.३१-: वाढत्या उन्हामुळे शिरोडा आणि परिसरातील जलस्त्रोत आटत आहेत. त्यामुळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अशा परिस्थितीत आपल्या माध्यमातून पाणी टंचाईग्रस्त गावांच्यासाठी मोफत पाणी टँकर पुरवठा सुरू केला आहे. आज याचा शुभारंभ युवा उद्योजक श्री विशाल परब यांच्या हस्तेगांधीनगर येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत…

Read More

कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा यांची नियुक्ती…

⚡कणकवली ता.३१-: कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष कुमार झा यांनी एम.एससी, लखनौ विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई येथून मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे. तसेच नियुक्तीपूर्वी कोकण रेल्वेच्या चेअरमन पदी व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये संचालक म्हणून काम केले आहे.संतोष कुमार झा हे उद्या…

Read More

जन कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाची विकासकामे करण्यावर भर देणार…

विशाल परब:भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.३१-: “पायाभूत सुविधांसह जन कल्याणाच्या दृष्टीने विविध समस्या आणि अडचणी आपल्यासमोर आहेत. आचारसंहिता असल्याकारणाने मी त्या तात्काळ सोडवू शकत नाही ; परंतु या पुढील काळात मी नक्कीच त्या सोडवण्यावर भर देईल असा शब्द युवा नेते विशाल परब यांनी आज येथे दिला.दरम्यान जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे क्रिकेट खेळाडू…

Read More

अबालवृद्धांसह महिलांनी रंगांची उधळण करीत धुळवड केली साजरी…

वेंगुर्ले:होळी पौर्णिमेपासुन ७ दिवसांनी काही ठिकाणी साजरा होणारा शिमगोत्सव आज शनिवारी (३० मार्च) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  या धुळवडीच्या पार्श्वभूमीवर अबालवृद्धांसह महिलांनीही उत्स्फुर्त सहभाग घेत रंगांची उधळण केली.     शिमगोत्सवानिमित्त होळीला नारळ अर्पण करण्यासाठी  ग्रामस्थ आपल्या रोंबटांसह मांडावर येऊन वार्षिक कार्यक्रम पार पडले. काही ठिकाणी ढोल ताशे तर काही ठिकाणी डिजे च्या तालावर लोकांनी नृत्याचा…

Read More
You cannot copy content of this page