४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त: काळोखाचा फायदा घेत चालक फरार..
⚡बांदा ता.३१-: गोव्यातून आंध्रप्रदेश मध्ये होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या भरारी पथकाने कारवाई करत ४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज पहाटे पत्रादेवी येथील अबकारी खात्याच्या तपासणी नाक्यावर करण्यात आली. काळोखाचा फायदा घेत चालक फरारी होण्यात यशस्वी झाला.
भरारी पथकाने ३० लाख रुपये किमतीची दारू व १२ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला. ही कारवाई निरीक्षक राजेश नाईक, जयेश बांदेकर, उपनिरीक्षक वासुदेव गवस, विशाल गवस, जितेंद्र गवस, लाडू गावकर, तुकाराम जंगले यांच्या पथकाने केली.
