रोणापामध्ये 3 रोजी रक्तदान शिबिर…

⚡बांदा ता.३१-: माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल आयोजित दि. 3 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मडुरा तिठा येथील सावित्री शंकर मंगल कार्यालयात शिबिरास सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. रोणापाल गावासह पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजवंत रुग्णांना जीवनदान द्यावे असे आवाहन, श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page