विशाल परब यांच्याकडून शिरोडावाशियांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा…

गांधीनगर येथे पाणीटंचाई; ग्रामस्थांनी केली होती मागणी

वेंगुर्ला ता.३१-: वाढत्या उन्हामुळे शिरोडा आणि परिसरातील जलस्त्रोत आटत आहेत. त्यामुळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अशा परिस्थितीत आपल्या माध्यमातून पाणी टंचाईग्रस्त गावांच्यासाठी मोफत पाणी टँकर पुरवठा सुरू केला आहे. आज याचा शुभारंभ युवा उद्योजक श्री विशाल परब यांच्या हस्ते
गांधीनगर येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी पोटापाण्याचा प्रश्न आला की तिथे आचारसंहिता लागत नाही, असा माझा प्रामाणिक विचार आहे. काही दिवसांपूर्वी पाणी नसल्यामुळे अनेक अडचणी येतात, असे शिरोडा येथील ग्रामस्थांनी सांगितले. यावर तात्काळ मोफत पाणी टँकर पुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे. लोकांना पाणी उपलब्ध करून देणे खरंतर ही पुण्याची गोष्ट आहे आणि ते पुण्य मला जर लाभत असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजतो. कुटुंबातील सदस्य म्हणून मला कोणतीही अडचण आली तर हाक द्या, मी कायम तुमच्या मदतीला कटिबद्ध असेल, असा विश्वास उपस्थितांना दिला.

You cannot copy content of this page