विशाल परब:भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच शुभारंभ..
⚡सावंतवाडी ता.३१-: “पायाभूत सुविधांसह जन कल्याणाच्या दृष्टीने विविध समस्या आणि अडचणी आपल्यासमोर आहेत. आचारसंहिता असल्याकारणाने मी त्या तात्काळ सोडवू शकत नाही ; परंतु या पुढील काळात मी नक्कीच त्या सोडवण्यावर भर देईल असा शब्द युवा नेते विशाल परब यांनी आज येथे दिला.दरम्यान जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे क्रिकेट खेळाडू स्पर्धकांना शुभेच्छा देत सन्मानाचा स्वीकार केला.
यावेळी मयुर लाखे मित्र मंडळ आयोजित रंगिला चषक 2024 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी परिसरातील जेष्ठ नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेट खेळाडू उपस्थित होते.
