वेंगुर्ले:
होळी पौर्णिमेपासुन ७ दिवसांनी काही ठिकाणी साजरा होणारा शिमगोत्सव आज शनिवारी (३० मार्च) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या धुळवडीच्या पार्श्वभूमीवर अबालवृद्धांसह महिलांनीही उत्स्फुर्त सहभाग घेत रंगांची उधळण केली.
शिमगोत्सवानिमित्त होळीला नारळ अर्पण करण्यासाठी ग्रामस्थ आपल्या रोंबटांसह मांडावर येऊन वार्षिक कार्यक्रम पार पडले. काही ठिकाणी ढोल ताशे तर काही ठिकाणी डिजे च्या तालावर लोकांनी नृत्याचा आनंद लुटला. सायंकाळपर्यंत हा धुळवडीचा कार्यक्रम सुरु होता.
फोटोओळी –
मातोंड येथील रामेश्वर मंदिर शेजारी रंगपंचमी साजरी करताना गावठणवाडी येथील युवक वर्ग
