Headlines

चौकुळ मधील विज आणि बीएसएनएल विरोधातील ठिय्या आंदोलन आश्वासानंतर मागे…

आंबोली,ता.११ : चौकुळ गावामध्ये वारंवार होणाऱ्या विजेच्या आणि मोबाईल रेंज च्या समस्येवर चौकुळ गावातील ग्रामस्थांनी युवकांनी मिळून येथिल नंदू गावडे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे सहकारी तुकाराम गावडे,अविल गावडे ,शशी शेटवे ,रतन गावडे, अजित गावडे, नितीन गावडे व जवळपास सत्तर युवकांनी मिळून ठिय्या आंदोलन केले आणि जोपर्यंत बीएसएनएल चा नेटवर्क ची समस्या सुटत नाही तोपर्यंत आंदोलन…

Read More

जामसंडे वेळवाडी येथील राजन दहिबावकर यांच्या घराचे छप्पर मुसळधार पावसामुळे कोसळले…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , नगरसेवक बुवा तारी यांनी केली पाहणी.. ⚡देवगड ता.१०-: देवगड मध्ये शनिवारी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला पाऊस सुरू झाल्यानंतर प्रथमच पावसाने दीडशे चा टप्पा ओलांडला असून रविवारी सकाळी १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वेळवाडी येथील राजन भिकाजी दहीबावकर यांच्या घराच्या छपराचा काही भाग कोसळून दहिबावकर यांचे…

Read More

बेपत्ता मच्छिमाराचा कोस्टगार्ड हेलिकॉप्टरद्वारे शोध…

⚡मालवण ता.१०-:तळाशील येथे खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय 55) या मच्छिमारांचा शोध सूरू आहे. दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी मालवण सर्जेकोट येथे दाखल शोध मोहिमेचा आढावा घेतला. या वेळी तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच प्रशासकीय अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते….

Read More

आम. वैभव नाईक यांनी काम न केल्यामुळेच विनायक राऊत यांचा पराभव…

बबन शिंदे:मालवण- कुडाळचा पुढील आमदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून येईल… ⚡मालवण ता.१०-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात प्रथमच भाजपच्या निशाणीवरील उमेदवार निवडून आला. भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयात शिवसेनेने खारीचा वाटा उचलला. मालवण कुडाळ मतदार संघाने राणे यांना २६, २३६ एवढे मताधिक्य दिले. या मतदार संघातील आमदार वैभव नाईक यांनी काम न केल्यामुळेच जनतेने…

Read More

जनहिताच्या प्रश्नांबाबत आमदार, खासदार यांनी दुर्लक्ष केल्यानेच मालवणातील मताधिक्य घटले…

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर: ठाकरे शिवसेनेला घरचा आहेर .. ⚡मालवण ता.१०-: आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी जनहिताच्या प्रश्नांच्या अनुषंगाने मालवण नगरपरिषेच्या प्रशासकीय कारभाराबाबत मवाळ धोरण स्वीकारले. शहरातील प्रश्नांबाबत आमदार, खासदार यांच्याकडे त्यांच्याच पक्षाचा माजी नगरध्यक्ष म्हणून गेली दोन वर्षे सातत्याने आपण भूमिका मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाले. यामुळेच लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव…

Read More

दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण…?

अशोक परब:प्रशासन कानाडोळा असल्याचाही केला आरोप.. ⚡बांदा ता.१०-: पाटकर पुलाजवळील रस्ता अत्यंत धोकादायक झाला असून याठिकाणी अपघात होऊन मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उबाठा सेनेचे नेते अशोक परब यांनी उपस्थित केला आहे. पाटकर पुलाजवळ आधीच धोकादायक असलेल्या रस्त्यावर बारीक ग्रीड आणून टाकली आहे. या रस्त्यावरून रात्रंदिवस रहदारी चालू असते. शाळकरी मुले, वृद्ध…

Read More

भालावल गावातील समस्या राणेंच्या माध्यमातून मार्गी लावू…

संजू परब: गावातील विविध विकासाच्या प्रश्नांसंदर्भात पदाधिकाऱ्यांची भेट घेत केली चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजू परब यांनी भालावल गावात आज भेट देत अतिवृष्टी व विविध गावाच्या समस्या संदर्भात गावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. दरम्यान गावातील जे काय समस्या असतील ते आता राणेंच्या माध्यमातून आपण सोडू अशी ग्वाही यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना श्री…

Read More

सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेत वर्धापन दिन निमित्त दिल्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली.यावेळी त्यांना पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी राज्यमंत्री मा. प्रवीणभाई भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा‌. व्हिक्टर डॉन्टस, उद्योजक मा. संदीप घारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा. शरदचंद्र पवार…

Read More

कुडाळमधील सांस्कृतिक चळवळीला लागेल ते सहकार्य करणार…

अभिजित पानसे यांची केदार सामंत यांच्याशी चर्चा.. ⚡कुडाळ ता.१०-: सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांनी आज कुडाळ भेटीदरम्यान कुडाळ मधील रंगकर्मी केदार सामंत यांच्याबरोबर विवीध सांस्कृतिक विषयावर चर्चा करुन लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब उपस्थित होते.केदार सामंत यांनी कुडाळ मधील सर्व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती…

Read More

दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने 13 जून रोजी दहावी -बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

⚡सावंतवाडी ता.१०-:सावंतवाडी तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान.नाम. दिपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने दि.१३ जून रोजी संध्याकाळी ३ वाजता वैश्य भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक हायस्कूल मधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित…

Read More
You cannot copy content of this page