दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण…?

अशोक परब:प्रशासन कानाडोळा असल्याचाही केला आरोप..

⚡बांदा ता.१०-: पाटकर पुलाजवळील रस्ता अत्यंत धोकादायक झाला असून याठिकाणी अपघात होऊन मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उबाठा सेनेचे नेते अशोक परब यांनी उपस्थित केला आहे.

पाटकर पुलाजवळ आधीच धोकादायक असलेल्या रस्त्यावर बारीक ग्रीड आणून टाकली आहे. या रस्त्यावरून रात्रंदिवस रहदारी चालू असते. शाळकरी मुले, वृद्ध माणसे ये जा करत असतात. असे असताना प्रशासन कानाडोळा करीत आहे. याठिकाणी अपघात होऊन जीवित किंवा वित्त हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा खडा सवाल श्री. परब यांनी उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page