आंबोली,ता.११ : चौकुळ गावामध्ये वारंवार होणाऱ्या विजेच्या आणि मोबाईल रेंज च्या समस्येवर चौकुळ गावातील ग्रामस्थांनी युवकांनी मिळून येथिल नंदू गावडे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे सहकारी तुकाराम गावडे,अविल गावडे ,शशी शेटवे ,रतन गावडे, अजित गावडे, नितीन गावडे व जवळपास सत्तर युवकांनी मिळून ठिय्या आंदोलन केले आणि जोपर्यंत बीएसएनएल चा नेटवर्क ची समस्या सुटत नाही तोपर्यंत आंदोलन उठणार नाही असे सरपंच बाबू शेटवे यांना सांगितले.
यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश शिवाजी गावडे यांनी तेथे आंदोलकाची भेट घेऊन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर बीएसएनएल अधिकाऱ्यांशी आमदार दीपक भाई केसरकर यांनी फोनवर चर्चा करून बीएसएनएल चे प्रबंधक रविकिरण यांनी आपण उद्या दिनांक ११ जून रोजी चौकुळ येथील आंदोलकांना भेटून चर्चा असे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलकांनी ठीक दहा वाजून तीस मिनिटांनी आंदोलन मागे घेतले.यावेळी विज वितरण चे कनिष्ट अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली.
