⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली.यावेळी त्यांना पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री मा. प्रवीणभाई भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा. व्हिक्टर डॉन्टस, उद्योजक मा. संदीप घारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मा. शरदचंद्र पवार कोकणातील पावसाची, शेतकऱ्यांची आस्थेने चौकशी करत कोकणच्या विविध विषयांवर चर्चा केली. व्यस्त कालावधीतून बहुमोल असा वेळ कोकणातील आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिला.
