भर बसस्थानकासमोर लोखंडी शेगेसह मारहाण
कणकवलीच्या कायदा – सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह:व्हायरल व्हिडिओमुळे शहरात खळबळ:उड्डाणपुलाखाली कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची नागरिकांची मागणी.. कणकवली : कणकवली शहरातील कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली छत्री दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने लोखंडी शेगेसारख्या वस्तूने धमकावत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ…
