Headlines

हळवल तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सचिन ठाकूर यांची बिनविरोध निवड

कणकवली : तालुक्यातील हळवल गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सचिन मोहन ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सचिन ठाकूर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

सचिन मोहन ठाकूर हे गेली अनेक वर्षे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. गावातील सामाजिक सलोखा, नागरिकांच्या समस्या तसेच गावाच्या विकासासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावातील विविध वाद व तंटे सामोपचाराने सोडविण्यासाठी तसेच गावात शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन ठाकूर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page