⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी : वेत्ये गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सागर गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावातील सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखण्यासाठी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष सागर गावडे यांनी व्यक्त केला.
गावातील नागरिकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ व विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
