एसटीच्या कारभारावर आशिष सुभेदारांचा संताप..
⚡सावंतवाडी ता.०२-: एस टी महामंडळाने महिलांना तिकीटा मध्ये दिलेली अर्धी सवलत एन सी एम सी कार्ड काढून देखील कुचकामी ठरत आहे, कार्ड मध्ये पैसे असून देखील महामंडळाचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे एस टी बस प्रवासात तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने महिलांकडून फुल तिकीटचे पैसे आकारण्यात येतात त्यामुळे महिला प्रवाश्यांमध्ये नाराजी असून याबाबत एस टी महामंडळ प्रशासनाने योग्य तो पर्याय काढावा आणि सवलत द्यावी अन्यथा आगारप्रमुख यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना प्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
एस टी महामंडळाने महिलांसाठी विशेष बस प्रवास योजने अंतर्गत कुठेही प्रवास केल्यास तिकिटात अर्धी सवलत दिली आहे. या सवलती नुसार दैनदिन प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवासाच्या दरानुसार अर्धे तिकीट आकारले जाते. ही योजना सुरू असताना प्रवासात या सवलतीचा फायदा पुढे सुरू राहावा यासाठी पुन्हा योजनेत बदल करत महिलांना एन सी एम सी कार्ड काढण्याचा नवा नियम लागू करण्यात आला. हे कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने आता बहुतांशी महिलां प्रवासी यानी एन सी एम सी कार्ड काढले आहे. मात्र कार्ड काढून देखील बहुतांशी महिला प्रवासी या योजने पासून वंचित राहत आहेत. कार्ड मध्ये पैसे राखीव ठेवून देखील प्रवासात हे कार्ड महामंडळाचे सर्व्हर डाऊन असल्याने योग्य पद्धतीने काम करत नाही त्यामुळे महिला प्रवासी यांना पूर्ण तिकीट एस टी प्रशासना कडून आकारले जाते. महिलांना प्रवासात विशेष सवलत देऊन देखील फुल तिकीट आकारले जात असेल तर अर्धी तिकीट दर योजनेचा उपयोग काय असा सवाल युवा सेना प्रमुख आशिष सुभेदार यांनी उपस्थित केला असून एस टी प्रशासनाकडून ही महिलांची फसवणूक सुरू आहे त्यामुळे येत्या आठ दिवसात सर्व्हर मध्ये महामंडळाने सुधारणा न केल्यास आगार प्रमुख यांना घेराव घालून जाब विचारण्यात येईल असा इशारा उबाठा शिवसेना युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
