Headlines

नावळे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रमेश गुरव यांची बिनविरोध निवड…

वैभववाडी प्रतिनिधी
नावळे ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रमेश तुकाराम गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नावळे ग्रामपंचायतची ऑगस्ट महिन्यातील ग्रामसभा उपसरपंच संजय रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय नावे येथे संपन्न झाली या ग्रामसभेमध्ये नव्याने तंटामुक्ती समिती घटीत करण्यात आली यावेळी नूतन अध्यक्षपदी रमेश तुकाराम गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके रश्मी गुरव गंगाराम गुरखे पल्लवी गुरव पोलीस पाटील स्नेहा शेळके माजी पोलीस पाटील विलास रावराणे हरी कदम अनिता गुरव शर्वरी रावराणे ग्राम विकास अधिकारी संभाजी वाघमोडे कृषी सहाय्यक वाघमोडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page