Headlines

सात सफाई कर्मचाऱ्यांना काढले…

प्रशासनाच्या बैठकीतच ठेकेदाराची पोलखोल:वेतन कपात, भंगार वाहनांसह हॅन्ड ग्लोज-मास्कचा मुद्दा ऐरणीवर:अडीच तासांच्या बैठकीत ठेकेदाराला नगराध्यक्षांचे खडे बोल..

⚡कणकवली ता.०२-: कणकवली नगरपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नगरपंचायत प्रशासन आणि कामगार संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसह काढून टाकण्यात आलेल्या सात सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने पुन्हा कामावर घेण्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कामगारांच्या वेतनातील अन्यायकारक कपातीचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. कामगार गैरहजर नसतानाही वेतन कपात केली जात असल्यास ती यापुढे सहन केली जाणार नाही, असा इशारा कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत, त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. अन्यायकारक पद्धतीने वेतन कपात होऊ नये, यासाठी कंत्राटदाराला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सफाई कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून पुरविण्यात येणाऱ्या वाहनांची अवस्थाही बैठकीत मांडण्यात आली. अनेक वाहने सुस्थितीत नसल्याने कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणी येत असल्याची तक्रार कामगारांनी केली. तसेच हॅन्ड ग्लोज व मास्क पुरवण्यात येत नसल्याची तक्रार देखील कामगारांनी केली त्यावर हँड ग्लोज आणि मास्क रोज पुरविण्यात येत असल्याचे खोटे ठेकेदाराकडून सांगण्यात आले.

यावर नगराध्यक्ष पारकर यांनी कामगारांना चांगल्या व सुस्थितीत असलेल्या वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले ही बैठक सलग दोन ते अडीच तास चालली या बैठकीस नगरसेवक लुकेश कांबळे, कास्ट ट्राईब कामगार संघटनेचे नेते संदीप कदम, सत्यशोधक कामगार संघटनेचे संस्थापक अॅड. सुदीप कांबळे, सफाई कर्मचारी संघटनेचे दीपक तांबे तसेच संबंधित कामगार उपस्थित होते. काढून टाकण्यात आलेल्या सात कर्मचाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न, वेतन कपात, वाहनांची सुविधा आणि कामगारांच्या इतर मागण्या याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने कामगारांच्या प्रश्नांना आता तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page