Global Maharashtra Breaking News

कुडाळ मध्ये अजून दोन सराईत गुन्हेगारांची हद्दपारी…

कुडाळ पोलिसांकडून आतापर्यंत चालूवर्षात ८ जणांची हद्दपारी.. कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगार, रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (वय 30 वर्षे, रा. आकेरी, घाडीवाडी, ता. कुडाळ) आणि आप्पा ऊर्फ परेश कृष्णा धुरी (वय 33 वर्षे रा. माणगांव कुंभारवाडी, ता. कुडाळ) याना कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून…

Read More

एड्स दिनानिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालयाकडून जनजागृती रॅलीचे आयोजन…

कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त महाविद्यालयाच्या एनएसएस व एनसीसी विभागांद्वारे तसेच कोकण कला आणि शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. यावेळी कोकण कला आणि…

Read More

मतदानादरम्यान शिंदे शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस, कार पोलिसांच्या ताब्यात…

⚡सावंतवाडी ता.०२-: शहरात सायंकाळी शेवटच्या टप्प्यात मतदान सुरू असताना भाजप युवा नेते विशाल परब त्याच्या खाजगी बॉडीगार्डच्या ताब्यात असलेली स्कॉर्पिओ कार शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या अंगावर घालण्याच्या प्रकारावरून मोठा वादंग होऊन काहीसा मारहाणीचा प्रकार प्रभाग क्रमांक नऊमध्ये फॉरेस्ट ऑफिस समोर हा घडला. यानंतर संतप्त शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबधित बॉडीगार्डसह कार रोखून धरत ती पोलिसांच्या ताब्यात दिली….

Read More

किनळे येथील श्रीदेवी माऊली सातेरी देवस्थानचा उद्या वार्षिक जत्रोत्सव..

सावंतवाडी : किनळे येथील श्री देवी माऊली सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव उद्या बुधवार ३ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.यनिमित्त सकाळी मंदिरात पूजा, अभिषेक, दुपारी नैवेद्य, भाविक भक्तांसाठी केळी- ठेवणे, नवस बोलणे-फोडणे, ओटी भरणे गाऱ्हाणे आदी कार्यक्रम होणार असून रात्री फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी प्रदक्षिणा त्यानंतर रात्री उशिरा आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग…

Read More

आजगाव येथील गीताई पठण स्पर्धेत लहान गटात गायत्री शेणई तर मोठ्या गटात आराध्या नाईक प्रथम…

आजगाव मराठी शाळा, माजी विद्यार्थी संघ आणि मराठी ग्रंथालय आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.. सावंतवाडी : आजगाव येथील गीताई पठण स्पर्धेत लहान गटात गायत्री शेणई तर मोठ्या गटात आराध्या नाईकयांनी प्रथम क्रमांक पटकाविला.मराठी ग्रंथालय आजगाव येथे या गीताई पठण स्पर्धेचे आयोजन आजगाव मराठी शाळा, माजी विद्यार्थी संघ आणि मराठी ग्रंथालय आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात…

Read More

शहरातील नागरिकांचा प्रतिसाद बघता शिंदे शिवसेनेच्या पॅनलला यश मिळेल…

आमदार दीपक केसरकर:धनशक्तीला बळी न पडता विकासाला मतदान करा.. ⚡सावंतवाडी ता.०१-: शहरातील नागरिकांचा प्रतिसाद बघता शिंदे शिवसेनेच्या पॅनलला यश मिळेल, माझा पाठिंबा दुसऱ्या कुणाला आहे असं सातत्याने म्हणणं योग्य नाही. माझा पाठिंबा शिंदे शिवसेनेच्या अधिकृत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांनाच आहे. शहराचा विकास झपाट्याने सुरू आहे. त्यामुळे धनशक्तीला बळी न पडता विकासाला मतदान करा…

Read More

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच ती जबाबदारी आमची…

लखमराजे भोंसले:निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरीही मोती तलाव जनतेचाच,आ. दीपक केसरकर यांनी राजकारणावर केलेली टीका वेदनादायी : जनता विसरणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.०१-:मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे केवळ निवडणुकीपुरते राजकारण केले जात आहे. आपल्या निवडणुकीत हॉस्पिटल होणार म्हणून मते घ्यायची व आता ते कसे होणार नाही असे सांगून मते मिळवायची हे राजकारण सुरू आहे.आमच्या सह्या झालेल्याच आहेत वाटल्यास उर्वरित…

Read More

तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी,..

विशाल परब यांचे सावंतवाडीकरांना आवाहन:शहराचा कायापालट करण्यात मी अपयशी ठरलो, तर राजकारणातून संन्यास घेईन,.. ⚡सावंतवाडी ता.०१-:तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी, असे आवाहन भाजप युवा नेते विशाल परब यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले. “मला कोणावर टीका करायची नाही. सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझे सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहेत. जनतेने भाजपला एकदा संधी द्यावी….

Read More

आनंद शिरवलकर यांची सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्यातून १ वर्षसाठी हद्दपार…

कुडाळ : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद भास्कर शिरवलकर (वय ४३, रा. केळबाईवाडी कुडाळ) यांना कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कुडाळ पोलिसांकडून आज त्यांना गोवा हद्दीत हजर करण्यात आले. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरीकांचे…

Read More

खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे विरोधकांचा ‘रडीचा डाव’-:आशिष शेलार…

मालवण,दि प्रतिनिधीमालवण पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेदवारांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद ‘काळ्या दगडावरची सफेद रेघ’ असल्याचे सांगत मालवणकरांचे मन आणि मत भाजपच्या बाजूने ठरले आहे, असा ठाम विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करणे, हा विरोधकांनी ‘रडीचा डाव’ टाकल्याचा पुरावा आहे….

Read More
You cannot copy content of this page