Headlines

Global Maharashtra Breaking News

दोडामार्ग मध्ये परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित करू नका…

बाबुराव धुरी:अन्यथा आंदोलन छेडू.. ⚡दोडामार्ग ता.१६-:दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी ठाकरे सेना जिल्हाध्यक्ष बाबूराव धुरी यांनी केली आहे.आर्थिक वर्षाच्या कारणावरून थकीत बिल असल्यास ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी वर केला आहे. परीक्षा काळात वीज खंडित झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो, त्यामुळे सिंधुदुर्ग…

Read Full News

चिंदर येथे शिवजयंती निमित्त नेत्रतपासणी २० रोजी…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आयोजन.. ⚡मालवण ता.१६-:शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा चिंदर यांच्यावतीने शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत चिंदर गावठणवाडी सातेरी मंदिर नजीक, मिलिंद चिंदरकर यांच्या घरी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरात मोफत नामवंत तज्ञांकडून कॉम्प्युटराइज्ड…

Read Full News

दिवाबत्ती दुरुस्ती करून दिल्याबद्दल मुस्लिमवाडीतील ग्रामस्थांनी अर्णव स्वार यांचे मानले आभार…

⚡बांदा ता.१६-: गेले सुमारे एक वर्ष मुस्लिमवाडी परिसरात काही कारणांमुळे दिवाबत्तीचा पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अंधारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. दरम्यान युवा नेतृत्व अर्णव स्वार हे मुस्लिमवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त रात्रीच्या वेळी आले असता त्यांना परिसरात दिवाबत्तीचा अभाव जाणवला. हा प्रश्न…

Read Full News

बांद्यात जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्वयंसिद्धा मी’ स्त्रीशक्ती महोत्सवाचे आयोजन…

⚡बांदा ता.१६-: जागतिक महिला दिनानिमित्त क्रिएटिव्ह सखी ग्रुप, बांदा यांच्या वतीने “स्वयंसिद्धा मी” हा आत्मनिर्भर स्त्रीशक्तीचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. विठ्ठल मंदिर हॉल, गांधी चौक येथे दिनांक ७ व ८ मार्च रोजी हा दोन दिवसांचा महोत्सव संपन्न होणार आहे.या महोत्सवात महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खाद्य जत्रा भरवण्यात येणार असून, सौंदर्य प्रसाधने, वस्त्र…

Read Full News

दोडामार्ग तालुक्यातील तेरवण पेंढरेवाडी येथे पत्रा शेड कामाचे भूमीपूजन…

⚡दोडामार्ग ता.१६-: तेरवण पेंढरेवाडी (ता. दोडामार्ग) येथील पत्रा शेड बांधकामासाठी स्थानिक आमदार तथा माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामाचे भूमीपूजन ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.दोडामार्ग तालुक्यातील डोंगराळ भागातील हे शेवटचे गाव असून, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर या गावाच्या विकासाला सुरुवात आमदार केसरकर यांनी केली. गावात दोन स्मशानभूमी, सभागृह, पत्रा शेड, नवीन शाळेसाठी वर्गखोली…

Read Full News

सातार्डा महात्मा गांधी प्री – प्रायमरी स्कूल चे स्नेहसंमेलन उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.१६-: सातार्डा येथील महात्मा गांधी प्री – प्रायमरी स्कूल चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.यावेळी शाळेची प्रगती समाधानकारक असून शाळेसाठी लागणारे सहकार्य आपण करणार असल्याचे सांगतानाच, ॲड .प्रसाद आसोलकर यांनी शिक्षकांच्या पगारासाठी पुढाकार घेतल्याने ते कौतुकास पात्र असल्याचे नवनिर्वाचित जि.प.सदस्य सुदन कवठणकर यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तसेच उपस्थितांचे गुलाब पुष्प…

Read Full News

वैभववाडीत १७-१८ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषद…

⚡वैभववाडी ता.१६-: आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे रसायनशास्त्र विभागअंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 व 18 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे उपस्थित राहणार आहेत.. या परिषदेत एकूण…

Read Full News

मोती तलाव परिसरात महिलां, बालकां व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा…

ॲड. सिद्धार्थ भांबुरे:नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच वेधले निवेदनद्वारे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी येथील मोती तलाव परिसरात महिलां, बालकां व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, तसेच पावसाळ्यातही पर्यटकांना बसता यावे यासाठी शेड उभारण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. निवेदनात म्हटले…

Read Full News

श्री सचिन जाधव यांना मानद डॉक्टरेट प्रदान…

⚡देवगड ता.१६-: प्राथमिक शिक्षक सचिन लक्ष्मण जाधव यांना चेन्नई येथील ग्लोबल ह्युमन पिस युनिव्हर्सिटी कडून नुकतीच डॉक्टर ऑफ एज्युकेशन ही मानद डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आले आहे. चेन्नई येथील भारतीय विद्या भवन मध्ये संपन्न झालेय या पदवीदान कार्यक्रमासाठी वियापीठाचे चेअरमन डॉ पी मॅन्युएल, न्यायमूर्ती डॉ व्यंकटेश ,श्री के.संपत कुमार IAS, डॉ के. सुकुमारा ,डॉ. जया शंकर…

Read Full News

शॉर्टसर्किटने जळालेल्या आंबा-काजू बागेच्या नुकसानभरपाईसाठी चौकेकर यांचं महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरु…

⚡सावंतवाडी ता.१६-: विद्युत वाहिनीला सलग दोन वर्ष शॉर्टसर्किट होऊन आंबा व काजू बागेला आग लागून संपूर्ण बाग जळून खाक झाली. मात्र, अद्यापपर्यंत शासनाकडून एकही रूपयांची नुकसानभरपाई न मिळाल्याने केशव चौकेकर व आपा चौकेकर यांनी महावितरण कार्यालय सावंतवाडी समोर आमरण उपोषण छेडल आहे. श्री. चौकेकर यांच म्हणणं आहे की, २९ फेब्रुवारी २०२४ तसेच ६ मे २०२५…

Read Full News

You cannot copy content of this page