Headlines

नाट्यकर्मी सुहास वरूणकर यांची उद्या कणकवलीत शोकसभा

कुडाळ : सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व , प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक सर्वांचाच लाडका सुहासदादा यांचे रविवार 11रोजी अकाली दुःखद निधन झाले. त्यांच्या प्रति व्यक्त होण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या शनिवार 17 रोजी सकाळी ठीक 10 वाजता एच.पी.सी.एल. सभागृह, कणकवली कॉलेज कणकवली येथे कणकवली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व रंगकर्मी आणि तमाम सुहासप्रेमी यांच्यावतीने शोकसभा आयोजित केली आहे.आपण वेळीच उपस्थित राहून त्यांच्या प्रतिआदरांजली अर्पित करूया. असे आवाहन समस्त शोकाकुल सुहास प्रेमी रंगकर्मी व परिवार
यांनी केले आहे

You cannot copy content of this page