⚡बांदा ता.१५-: बांदेश्वर आय हॉस्पिटलच्या वतीने शेर्ले आरोसबागवाडी येथे शनिवारी (ता. १७) मोफत नेत्रतपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर जिल्हा परिषद शाळा क्र. २, आरोस बागवाडी येथे दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे. या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिरात नागरिकांची मोफत डोळे तपासणी, ईसीजी तसेच रक्तातील साखरेची तपासणी करण्यात येणार आहे. मधुमेह व रक्तदाबामुळे नेत्रपटलावर होणाऱ्या आजारांची तपासणी, त्यावरील उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर २० टक्के सवलत देण्यात येणार असून, फायबर चष्मा केवळ ५०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मूत्रपिंड, प्रोस्टेट व इतर संबंधित आजारांवरील उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रियांसाठीही आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याची माहिती आयोजकांनी दिली.
अधिक माहितीसाठी बांदेश्वर आय हॉस्पिटल, सायरा कॉम्प्लेक्स, बांदा येथे किंवा ९८६०८०३९३३ / ९४२२९०६९३३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

