Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत १९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान कलारंग महोत्सव…

दिवसा क्रिकेटचा थरार, रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी.. ⚡कणकवली ता.१८-: तालुक्यातील हळवल परबवाडी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ यांच्यावतीने १९ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भव्य ‘कलारंग महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिवसा क्रिकेट स्पर्धांचा थरार आणि रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असा दुहेरी आनंद या महोत्सवात अनुभवता येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने…

Read Full News

शिवजयंतीनिमित्त नूतन विद्यालय कळणे येथे चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद….

⚡दोडामार्ग ता.१८-:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नूतन विद्यालय कळणे येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली असून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक, युद्धनीती, महाराजांचा दरबार, गड-किल्ले आदी विविध ऐतिहासिक विषयांवर चित्रकलेच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेचे आयोजन प्रशालेचे शिक्षक संजय तायवाडे यांनी केले होते, तर स्पर्धेस…

Read Full News

जि प सदस्य रुपेश पावसकर यांचा रांगणातुळसुली येथे बाळूमामा देवस्थान कडून सत्कार…

⚡कुडाळ ता.१८-: नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचा रांगणातुळसुली येथील बाळूमामा देवस्थान येथे विजयी झाल्याबद्दल बाळूमामा देवस्थान कमिटी रांगणातुळसुली यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. रामदास तेंडोलकर यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। तसेच श्री.वरक व श्री.तांडेल यांच्यावतीने त्यांना मानाची घोंगडी देण्यात आली. यावेळी देवस्थान कमिटीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Full News

हुमरमळा वालावल येथे जि प सदस्य रुपेश पावसकर यांचा सत्कार…

⚡कुडाळ ता.१८-: हुमरमळा वालावल येथील श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा सत्कार देवस्थान कमीटीच्या वतीने करण्यात आला. हुमरमळा वालावल गावातील ज्येष्ठ नागरिक त्रिंबक देसाई व श्री देव रामेश्वर देवस्थान उपसल्लागार समिती खजिनदार प्रकाश परब यांच्या हस्ते त्यांना सन्मानित…

Read Full News

इन्सुली भिसेवाडीत विहिरीत पडलेला बिबट्या वनविभागने काढले सुखरूप बाहेर…

⚡सावंतवाडी ता.१८-: इन्सुली भिसेवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. यानंतर वनविभागाच्या टीमने त्याला बाहेर काढत ताब्यात घेतले. त्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला वन अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. इन्सुलीतील अमित धुरी यांच्या मालकीच्या विहिरीत हा बिबट्या पडला होता. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीच्या सुमारास…

Read Full News

5 वर्षे प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून काम करा…

माजी आ. वैभव नाईक ;आडेली जि. प. सदस्य विजय नाईक यांचा सत्कार.. ⚡वेंगुर्ला ता.१७-: आज आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने विश्वास दर्शवून जी आपल्याला संधी दिली आहे, त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करा. मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतला भेटी देऊन गावातील जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते अग्रक्रमाने सोडवा. जि. प. सदस्य म्हणून मिळणाऱ्या निधीचा उपयोग योग्य प्रकारे करून…

Read Full News

मे २०२७ पर्यंत सावंतवाडी नळपाणी योजनच काम पूर्ण होणार…

नगरसेवक प्रतीक बांदेकर: जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने कुठल्याही प्रकारे राजकारण केले जाणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.१७-: शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेली नव्या नळपाणी योजनेच्या कामात कुठलेही राजकारण न करता जनतेच्या सुचना ऐकून चांगले काम करण्यासाठी निश्चितच पावले उचलली जातील. येणाऱ्या मे २०२७ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आणून शहरवासीयांना सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा देण्यात येईल अशी ग्वाही…

Read Full News

मालवणात ८ मार्च रोजी महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धा…

ग्लोबल रक्तदाते व ग्लोबल रक्तविरांगना यांचे आयोजन.. ⚡मालवण ता.१७-:ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने महिला दिनानिमित्त आणि स्व. नेहा कोळंबकर -शंकरदास यांच्या स्मरणार्थ महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन २०२६ – रन फॉर हेल्थ या स्पर्धेचे आयोजन दि. ८ मार्च रोजी मालवण येथे करण्यात आले आहे. यावर्षी या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे….

Read Full News

मालवणात २६ रोजी मराठी शुद्धलेखन स्पर्धा…

⚡मालवण ता.१७-:‘मराठी भाषा दिवस’ उपक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब, मालवण यांच्यावतीने मालवण तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कन्याशाळा, मालवण येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी लेखणी, कागद व मजकूर आयोजकांकडून पुरविला जाणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना चषक व…

Read Full News

बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म भरण्याची विनामूल्य सोय…

⚡मालवण ता.१७-:मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमा अंतर्गत आरटीई दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना स्वयंअर्थ सहाय्यशाळा, विनाअनुदानित शाळांसाठी १७ फेब्रुवारी पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी १० मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म विनामूल्य भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read Full News

You cannot copy content of this page