Headlines

Global Maharashtra Breaking News

वैभववाडी नगरपंचायतीला ३ कोटी २५ लाखांचा विकासनिधी मंजूर…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रस्ते, पथदीप, गटारे व सुशोभीकरणाची कामे मार्गी; नगराध्यक्षा सौ. श्रद्धा रावराणे यांची माहिती.. ⚡वैभववाडी ता.२६-: पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वाभवे वैभववाडी नगरपंचायतीला नगरोत्थान मधून 3 कोटी 25 लाखाची विकास कामे मंजूर झाली आहेत . या भरघोस निधीतून वैभववाडी शहरातील विविध विकास कामे केली जाणार आहेत.रस्ते, पथदीप, सुशोभीकरण, बंदिस्त गटारे…

Read Full News

वेंगुर्ला – परुळेबाजार ग्रामपंचायतीचा बेलापूर येथे पुरस्कार देऊन विशेष सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.२५-:संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कोकण विभागीय स्पर्धेत सलग 2 वर्षे पुरस्कार प्राप्त करणार्‍या वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतचा आज बुधवारी (25 फेब्रुवारी ) कोकण विभागाच्या बेलापूर येथील आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर आयुक्त माणिक दिवे, सहाय्यक अप्पर आयुक्त प्रदीप घोरपडे, सिडकोचे व्यवस्थापक राजाराम दिघे आदी…

Read Full News

वेंगुर्ला येथे आंबा-काजू बागायतदार शेतकरी यांचा उद्या भव्य मोर्चा…

उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे यांच्या नेतृत्वाखाली होणार भव्य एल्गार.. ⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना व आंबा-काजू बागायतदार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक वेंगुर्ला श्री देवी सातेरी मंगल कार्यालय येथे पार पडली. या सभेत आंबा व काजू बागायतदारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत गुरुवार दि.26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता…

Read Full News

नियंत्रण सुटल्याने रोलर दहा फूट खोल दरीत…

तारामुंबरीत सुदैवाने जीवितहानी टळली, चालकाने उडी मारून वाचविले प्राण.. ⚡देवगड ता.२५-:तारामुंबरी येथील रस्त्याचे काम सुरू असताना चढ रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने रोलर न्युटड्ढल होवून मागे येत रस्त्यानजिक सुमारे १० फुट खोल भागात कलंडून तेथिल एका घरासमोर अपघातग्रस्त झाला.सुदैवाने घराच्या अंगणात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.तर चालकाने प्रसंगावधान राखून रोलरमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.ही घटना बुधवारी…

Read Full News

चौके ग्रामपंचायतीसाठी २५ लाखांचा निधी…

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न; दत्ता सामंत.. ⚡मालवण ता.२५-:चौके गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करणार तसेच ग्रामपंचायत इमारतीसाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांनी चौके ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना दिली. चौके ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित…

Read Full News

ग्रामस्वच्छता अभियानात बापर्डे विभागात प्रथम…

बापर्डे गावाचा कोकण विभागीय आयुक्त डॉ . विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव.. ⚡देवगड ता.२५-: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१९-२० मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत बापर्डे ग्रामपंचायतीने विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात मा. कोकण विभागीय आयुक्त डॉ . विजय सुर्यवंशी यांच्या…

Read Full News

कालव्यालगतच्या धोकादायक रस्त्याला संरक्षक गार्ड…

साईप्रसाद काणेकर यांच्या पाठपुराव्याला यश.. ⚡बांदा ता.२५-:बांदा–डिंगणे (बांबर्डी) मार्गावरील कालव्यालगतचा धोकादायक रस्ता अखेर सुरक्षित झाला असून त्या ठिकाणी संरक्षक गार्ड (रेलिंग) बसविण्यात आले आहेत. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. बांदा डिंगणे मार्गावर कालव्याच्या कडेला असलेला रस्ता अनेक वर्षांपासून अपघातप्रवण ठरला होता….

Read Full News

करूळ येथे वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला…

पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद.. ⚡कणकवली ता.२५-: तालुक्यातील करूळ गावात एका वृद्ध महिलेचा मृतदेह विहिरीजवळ आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंदाकिनी भिकाजी राणे (वय ८८, रा. माईन, घाडीवाडी, ता. कणकवली) या आपल्या बहिणीकडे करूळ येथे गेल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास करूळ येथील फोफेवाडी परिसरातील एका ग्रामस्थाच्या विहिरीच्या…

Read Full News

मालवणात हुंडाबळी प्रथेविरोधात जनजागृती कार्यक्रम संपन्न…

⚡मालवण ता.२५-:जिल्हा महिला बालविकास कार्यालय अंतर्गत अभय केंद्र मालवण सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हुंडाबळी एक अनिष्ट प्रथा या विरोधात कै. गंगुबाई कृष्णराव सिताराम देसाई सभागृह, मालवण येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात बालविकास प्रकल्प अधिकारी उल्का खोत, अभय केंद्र मालवणचे संरक्षण अधिकारी गौरव एखंडे, तसेच वन स्टॉप सेंटरच्या ॲड. मीनाक्षी…

Read Full News

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जनतेची कामे करावीत-: तहसीलदार गणेश लव्हे…

⚡मालवण ता.२५-:छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्या प्रश्नांची सोडवणूक केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गुणांचा आदर्श घेऊन आपण महसूल विभागामार्फत जनतेची कामे करावी, असे प्रतिपादन तहसीलदार गणेश लव्हे यांनी तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. याप्रसंगी डी.एड. कॉलेज मालवणच्या प्रा. आनंदी घोगळे, बार्टीचे मालवण समतादूत…

Read Full News

You cannot copy content of this page