Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा विकास सोसायटीचे कर्जदार सभासदांनी तात्काळ केवायसी पूर्ण करावे…

राजाराम (बाळू) सावंत यांचे आवाहन.. ⚡बांदा ता.२७-: बांदा विकास सोसायटीच्या सर्व कर्जदार सभासदांनी तात्काळ आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून संबंधित सभासदांनी आवश्यक कागदपत्रांसह सोसायटी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.सहकार आयुक्त यांनी सहकारी संस्थांमधील व्यवहार…

Read Full News

लिपिक भरती परीक्षेच्या केंद्रांत मोठा बदल…

सिंधुदुर्गनगरी, ता. २७: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७३ रिक्त लिपिक पदांसाठी उद्या, २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेच्या केंद्रांमध्ये आयबीपीएस संस्थेमार्फत मोठा बदल करण्यात आला आहे.अर्जदारांची संख्या मोठी असल्याने तसेच तांत्रिक सुविधांच्या मर्यादांमुळे ही परीक्षा आता केवळ सिंधुदुर्ग व गोवा येथे न होता प्रामुख्याने मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील केंद्रांवर पार पडणार आहे….

Read Full News

कुडाळ तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न…

संतोष वायंगणकर, जतीन भिसे, भरत केसरकर यांना पुरस्कार प्रदान:गुणवंत पत्रकार आणि त्यांच्या पाल्ल्यांचाही गौरव.. ⚡कुडाळ ता.२६-: कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या आज झालेल्या शानदार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे गुणवंत पत्रकार आणि त्यांच्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर यांना व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती जिल्हा पत्रकार पुरस्कार,…

Read Full News

एन्टिटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लास, कणकवलीचे राष्ट्रीय स्पर्धेत दैदिप्यमान यश…

कणकवली : पुणे येथे दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस अँड वैदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटिशन २०२५-२६ मध्ये कणकवली येथील एन्टिटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस अँड वैदिक मॅथ्स सेंटरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे २५०० विद्यार्थी या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी कणकवली केंद्रातील एकूण १० विद्यार्थ्यांची…

Read Full News

पंजाबी-मराठी भाषिक सेतू दृढ करणारे संत नामदेव चर्चासत्र नवी मुंबईत येथे संपन्न…

⚡बांदा ता.२६-: साहित्य अकादमी, दिल्ली यांच्या वतीने आणि पंजाबी कल्चर अँड वेलफेअर असोसिएशन यांच्या सहकार्याने ‘संत नामदेव जी’ या विषयावर आयोजित एकदिवसीय चर्चासत्र दि. २२ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथे अत्यंत उत्साहात व विद्वत्तापूर्ण वातावरणात पार पडले. भारतीय संत परंपरा, संत नामदेव ह्यांचे ह्या परंपरेतील योगदान आणि वर्तमान परिस्थितीत त्याचे महत्त्व असा सखोल ऊहापोह या…

Read Full News

महिला दिनानिमित्त ‘घे भरारी’चे झुंबा उपक्रम व बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.२६-: घे भरारी फाउंडेशन यांच्या वतीने महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी विशेष झुंबा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत काझी शहाबुद्दीन हॉल येथे हा उपक्रम पार पडणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मार्च महिन्यात कोणतीही फी आकारली जाणार नसून जास्तीत जास्त…

Read Full News

पालकमंत्र्यांच्या अवैध धंद्यांच्या कारवाईला यंत्रणेने दाखवली केराची टोपली…

पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील माळरानावर अवैध धंदे सुरू असून त्याला यंत्रणेतील काही जणांचा आशीर्वाद.. कणकवली : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्यावेळी पोलीस यंत्रणेला धारेवर धरत कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात पोलीस यंत्रणेने त्या आदेशांना केराची टोपली दाखवली, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला….

Read Full News

वेंगुर्ला येथे आंबा काजू बागायतदार यांचा भव्य मोर्चाद्वारे एल्गार…

वेंगुर्लेत आंबा – काजू प्रोससिंग कारखाना उभारणार : संजय गावडे.. ⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला बसस्थानक श्री साईबाबा मंदिर ते तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला पर्यंत वेंगुर्लातालुका शेतकरी न्याय हक्क संघटना व तालुक्यातील आंबा-काजू बागायतदार यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन छेडल्यानंतर वेंगुर्ला तहसीलदार यांना विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. याबाबत 6…

Read Full News

निरवडे ग्रामपंचायत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात कोकण विभागात प्रथम…

सावंतवाडी : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२१–२२ अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायतीने कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.या अभियानांतर्गत मिळालेल्या पुरस्काराचे वितरण काल २५ फेब्रुवारी रोजी बेलापूर येथील सिडको भवन येथे आयोजित समारंभात करण्यात आले. १० लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा सन्मान कोकण विभागीय आयुक्त विजयकुमार…

Read Full News

निरवडे ग्रामपंचायत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात कोकण विभागात प्रथम…

सावंतवाडी : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२१–२२ अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायतीने कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.या अभियानांतर्गत मिळालेल्या पुरस्काराचे वितरण काल २५ फेब्रुवारी रोजी बेलापूर येथील सिडको भवन येथे आयोजित समारंभात करण्यात आले. १० लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा सन्मान कोकण विभागीय आयुक्त विजयकुमार…

Read Full News

You cannot copy content of this page