बांदा विकास सोसायटीचे कर्जदार सभासदांनी तात्काळ केवायसी पूर्ण करावे…

राजाराम (बाळू) सावंत यांचे आवाहन..

⚡बांदा ता.२७-: बांदा विकास सोसायटीच्या सर्व कर्जदार सभासदांनी तात्काळ आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून संबंधित सभासदांनी आवश्यक कागदपत्रांसह सोसायटी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
सहकार आयुक्त यांनी सहकारी संस्थांमधील व्यवहार अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्याच्या उद्देशाने केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सर्व कर्जदार सभासदांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक असल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
केवायसीसाठी सभासदांनी आधार कार्ड, बँक पासबुक (संबंधित बँक खाते तपशील), आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे.
सर्व सभासदांनी विलंब न करता लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा भविष्यातील आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशाराही अध्यक्ष श्री सावंत यांनी दिला आहे. सोसायटी कार्यालयात केवायसी नोंदणी सुरू असून सभासदांनी सहकार्य करावे व अधिक माहितीसाठी सचिव सौ मयुरी परब यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो:-
बाळू सावंत.

You cannot copy content of this page