Headlines

Global Maharashtra Breaking News

संविता आश्रमाला राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरकडून मदत…

⚡कुडाळ ता.०५-: होळी सणाचे औचित्य साधून राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरआणि ए.टी. राणे यांच्या वतीने पणदूर येथील संविता आश्रमाला मदत करण्यात आली. वयोवृद्धांना मदत करणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहणे म्हणजे खरा सण साजरा करण्यासारखे आहे, असे ए.टी. राणे यांनी याप्रसंगी सांगितले.होळी हा आनंदाचा सण आहे. त्यामुळे राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरआणि ए.टी….

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘टेक्सलन्स २०२६’ उत्साहात संपन्न….

भावी अभियंत्यांच्या कल्पकतेचा अविष्कार : विविध स्मार्ट प्रोजेक्ट्सना विजेतेपद…. ⚡सावंतवाडी ता.०५-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातर्फे आणि आयएसटीई पुरस्कृत ‘टेक्सलन्स २०२६’ ही राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धा भोसले नॉलेज सिटी येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रमण बाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी उपप्राचार्य गजानन भोसले तसेच परीक्षक म्हणून शासकीय तंत्रनिकेतन कराडचे योगेश…

Read Full News

मळगावची अनोखी परंपरा जपणाऱी होळीतील घुमट प्रथा…

पंचायतन देवस्थानचे पारंपरिक घुमट ढोलांच्या गजरात घरोघरी… ⚡सावंतवाडी ता.०५-: तालुक्यातील मळगाव येथे होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मळगाव पंचायतन देवस्थानचे पारंपरिक ‘घुमट’ काल बुधवारपासून ढोल-ताशांच्या गजरात गावातील प्रत्येक वाडीत घराघरांत फिरविण्यात येत आहे. या पारंपरिक सोहळ्यात गावचे राऊळ, गावकर मानकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. धार्मिक वातावरणात सुरू झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण मळगाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले…

Read Full News

सावंतवाडीत अशोक वृक्ष तोडण्याच्या ठरावाला मनसेचा तीव्र विरोध…

फुटपाथ नूतनीकरणाच्या नावाखाली झाडे तोडू नयेत; अन्यथा पर्यावरणप्रेमींना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा,शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर… ⚡सावंतवाडी ता.०५-: शहराचे दूसरे नाव सुंदरवाडी असून नगरपालिकेचा विकास करताना सावंतवाडीतील अनेक जुने वृक्ष तोडण्याचा प्रकार केला जात आहे‌. हा प्रकार सुंदरवाडीच्या हिताचा नाही. तसेच भविष्यात फुटपाथ नुतनीकरण व दुरुस्तीच्या विषयांतर्ग शहरातील भूषण असलेले जुनाट अशोका झाडे तोडण्याचा जो…

Read Full News

यंदाचा आरती प्रभू पुरस्कार कवी प्रा. प्रवीण दवणे यांना जाहीर…

कुडाळ येथे ८ मार्चला वितरण सोहळा:बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या वतीने पुरस्कार.. ⚡कुडाळ ता.०५-: बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा ‘आरती प्रभू पुरस्कार-२०२६’ सुप्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या जन्मदिनी…

Read Full News

चिरे-वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची ड्रॅन्क अँड ड्राईव्ह मशीनने तपासणी करा..

जि प सदस्य रुपेश पावसकर यांची मागणी:कुडाळ पोलिसांना दिले निवेदन.. ⚡कुडाळ ता.०५-: चिरे,वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांची ड्रॅन्क अँड ड्राईव्ह मशीन, ब्रेथ अनेलायझर मशीन यांच्या सहाय्याने आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे दिले आहे.निवेदनात म्हटले आहे,…

Read Full News

बांदा परिसरातील अंगणवाड्यांची भाजपतर्फे पाहणी…

प्रमोद कामत यांच्याकडून स्वखर्चाने रंगकामाला सुरुवात.. ⚡बांदा ता.०५-:बांदा परिसरातील अंगणवाड्यांच्या सुविधा व अडचणींचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत आणि भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाड्यांची पाहणी करण्यात आली. आळवाडा, पानवळ तसेच जुनी ग्रामपंचायत परिसरातील अंगणवाड्यांना भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यात आली.यावेळी अंगणवाडी सेविका व पालकांशी संवाद साधत आवश्यक…

Read Full News

कासार्डे येथे अवैध सिलिका वाळू उत्खनन…

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा; माजी आ. परशुराम उपरकर… ⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे गावात मोठ्या प्रमाणात सिलिका वाळूचे विनापरवाना उत्खनन करून त्याची वाहतूक व विक्री सुरू असल्याचा आरोप करत यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनात त्यांनी म्हटले…

Read Full News

महिला दिनानिमित्त बांद्यात उखाणा स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.०५-: महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक सकाळ व बांदा महिला मराठा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा शहर मर्यादित खुली उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गडगेवाडी – बांदा येथे पार पडणार आहे. महिला दिनानिमित्त मराठी संस्कृतीची परंपरा जपण्याबरोबरच महिलांच्या…

Read Full News

भाजपा – शिवसेना महायुतीच्या वेंगुर्ला पंचायत समिती गटनेतेपदी आप्पी फणसेकर यांची एकमताने निवड …

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला पंचायत समितीमध्ये भाजपा – शिवसेना 9 सदस्यांचा वेंगुर्ला तालुका विकास आघाडी गट आज स्थापन करण्यात आला आहे . यावेळी गटनेतेपदी भारतीय जनता पार्टीचे तथा म्हापण पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य विष्णू उर्फ आप्पी फणसेकर यांची निवड करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे गट स्थापनेबाबत आज बुधवारी सायंकाळी अर्ज सादर करण्यात आला.याबाबत आप्पी…

Read Full News

You cannot copy content of this page