महिला दिनानिमित्त बांद्यात उखाणा स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.०५-: महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक सकाळ व बांदा महिला मराठा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा शहर मर्यादित खुली उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गडगेवाडी – बांदा येथे पार पडणार आहे.

महिला दिनानिमित्त मराठी संस्कृतीची परंपरा जपण्याबरोबरच महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही बांदा शहरातील मराठा समाजातील महिलांसाठी मर्यादित आहे. तरीही इच्छुक मराठा समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी सौ.ऋतुजा सावंत (9545718312) व सौ. लक्ष्मी गोविंद सावंत (9623796406) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page