⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला पंचायत समितीमध्ये भाजपा – शिवसेना 9 सदस्यांचा वेंगुर्ला तालुका विकास आघाडी गट आज स्थापन करण्यात आला आहे . यावेळी गटनेतेपदी भारतीय जनता पार्टीचे तथा म्हापण पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य विष्णू उर्फ आप्पी फणसेकर यांची निवड करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे गट स्थापनेबाबत आज बुधवारी सायंकाळी अर्ज सादर करण्यात आला.
याबाबत आप्पी फणसेकर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी अभिनंदन केले. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब, वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघांचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, शैलेश नार्वेकर, श्रीकृष्ण बांदवलकर, मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, पंचायत समिती सदस्य शंकर घारे, संकेत धुरी, सचिन देसाई, नितीन मांजरेकर, शीतल राऊत, साक्षी नार्वेकर, प्रियांका घाटवळ, सुचिता वजराटकर आदी उपस्थित होते.
भाजपा – शिवसेना महायुतीच्या वेंगुर्ला पंचायत समिती गटनेतेपदी आप्पी फणसेकर यांची एकमताने निवड …
