संविता आश्रमाला राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरकडून मदत…

⚡कुडाळ ता.०५-: होळी सणाचे औचित्य साधून राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरआणि ए.टी. राणे यांच्या वतीने पणदूर येथील संविता आश्रमाला मदत करण्यात आली. वयोवृद्धांना मदत करणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहणे म्हणजे खरा सण साजरा करण्यासारखे आहे, असे ए.टी. राणे यांनी याप्रसंगी सांगितले.
होळी हा आनंदाचा सण आहे. त्यामुळे राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरआणि ए.टी. राणे यांनी हा सण पणदूर येथील संविता आश्रमातील वृद्धाश्रमात साजरा केला. आनंदाचे रंग पसरवीत ज्येष्ठांसोबत वेळ घालवणे, मिठाई वाटणे आणि दिलेल्या उबदार शुभेच्छा यामुळे हा सण खरोखरच खास बनला. या आश्रमाला राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या कडून २५ मेडिकल कॉट्स तसेच ए.टी. राणे यांनी वैयक्तिक स्वरूपात देणगीचा चेक संविता आहरामचे संदीप परब यांच्याकडे सुपूर्द केला.
वृद्धांचे आशीर्वाद हे सर्वांपेक्षा महत्वाचे असून ए.टी. राणे यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. वृद्धांचे हास्य, आशीर्वाद आणि उबदारपणा यामुळे आपला दिवस खास बनला. त्यांच्यासोबत आनंद वाटून घेण्यात कृतज्ञता वाटली. त्यांचे हास्य ही आतापर्यंत मिळालेली सर्वोत्तम भेट होती. असे राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरचे ए. टी. राणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page