प्रमोद कामत यांच्याकडून स्वखर्चाने रंगकामाला सुरुवात..
⚡बांदा ता.०५-:
बांदा परिसरातील अंगणवाड्यांच्या सुविधा व अडचणींचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत आणि भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाड्यांची पाहणी करण्यात आली. आळवाडा, पानवळ तसेच जुनी ग्रामपंचायत परिसरातील अंगणवाड्यांना भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यात आली.
यावेळी अंगणवाडी सेविका व पालकांशी संवाद साधत आवश्यक सुविधा, साहित्याची कमतरता आणि मुलांच्या सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेण्यात आली. अंगणवाड्यांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रमोद कामत यांनी स्वखर्चातून आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच दिलेल्या शब्दाप्रमाणे एका अंगणवाडीच्या रंगकामाला अवघ्या अर्ध्या तासात प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. हे काम बांदा भाजपतर्फे प्रमोद कामत यांनी स्वखर्चाने करण्यात आले असून या साठी प्रमोद कामत यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
या पाहणी दौर्यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते श्यामकांत काणेकर, भाजप बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर, सरपंच प्रियांका नाईक, माजी उपसरपंच आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्यासह श्याम मांजरेकर, श्रेया केसकर, देवल येडवे, शैलेश केसरकर, राकेश केसरकर, निलेश नाटेकर, जय पटेकर, आप्पा धामापूरकर, सुनील धामापूरकर, सिद्धेश महाजन, नितेश पेडणेकर, उदय येडवे, विनेश गवस आदी उपस्थित होते.
