फुटपाथ नूतनीकरणाच्या नावाखाली झाडे तोडू नयेत; अन्यथा पर्यावरणप्रेमींना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा,शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर…
⚡सावंतवाडी ता.०५-: शहराचे दूसरे नाव सुंदरवाडी असून नगरपालिकेचा विकास करताना सावंतवाडीतील अनेक जुने वृक्ष तोडण्याचा प्रकार केला जात आहे. हा प्रकार सुंदरवाडीच्या हिताचा नाही. तसेच भविष्यात फुटपाथ नुतनीकरण व दुरुस्तीच्या विषयांतर्ग शहरातील भूषण असलेले जुनाट अशोका झाडे तोडण्याचा जो ठराव झाला तो अनआकलनीय आहे. अशोक झाडे विकासाच्या नावाखाली तोडण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र विरोध असून त्यामुळे सावंतवाडीकरांच्या भावाना दुखावल्या जातील. हा ठराव आपण वृक्ष समितीत असल्याने रद्द करून सावंतवाडीकरांना दिलासा द्यावा. हावा ठराव संमत झाल्यास त्याचा पुर्नविचार करावा. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तमाम पर्यावरण प्रेमींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा मनसे शहराध्यक्ष ॲड राजू कासकर यांनी दिला आहे.
