Headlines

Global Maharashtra Breaking News

काजू उत्पादनाला किलो मागे २०० रुपये हमीभाव द्या…

जिल्हा शेतकरी संघटना व काजू उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी.. सिंधुदुर्गनगरी ता १५चालू वर्षीच्या हंगामापूर्वी काजू बी करिता हमीभाव निश्चित करून काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो २०० रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा. अथवा काजू बी साठी बोनस अनुदान द्यावे. अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना व काजू उत्पादक शेतकरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे….

Read More

मळेवाड येथे २० डिसेंबर रोजी भजन स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१५-: श्री गजानन महाराज मंदिर मळेवाड हेदुलवाडी येथे भजन प्रेमी मित्र मंडळ मळेवाड यांनी मळेवाड – कोंडुरे गाव मर्यादित भव्य भजन स्पर्धेचे शनिवार दिनांक २० डिसेंबर रोजी आयोजन केले आहे. सदरील स्पर्धेसाठी भरघोस अशी पारितोषिक देण्यात येणार असून,यात प्रथम विजेत्या भजनी मंडळाला रु.५०००/-(प्रकाश पार्सेकर पुरस्कृत)द्वितीय रु.३०००/-(सदाशिव आईर) तर तृतीय रु .२०००/- ( सुदीप गावडे…

Read More

नेरूर ठाकुरवाडी शाळेच्या जागेतील अतिक्रमण हटवा…

मनसे प्रभारी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांची मागणी:अतिक्रमण न हटविल्यास मनसे कायदा हातात घेणार.. ⚡कुडाळ ता.१५-: गेले दोन-तीन महिन्यापासून नेरूर ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मालकीच्या जागेमधील रस्त्यावर अवैधरित्या झाडे लावून तसेच अनधिकृत गोठा बांधून अतिक्रमण झालेले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना सुद्धा प्रवेश करणे अत्यंत कठीण आणि कसरतीचे झालेले आहे. प्रशासनामार्फत येत्या दोन…

Read More

सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आरक्षित जागेच्या विकासासाठी कृती समितीचे निवेदन…

⚡सावंतवाडी ता.१५-: मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडाची जागा विकसित करण्याबाबत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडीकडून न.प. मुख्यकार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले की, जागा टाऊन प्लानिंग अंतर्गत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करीता २०१९ मध्ये आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात आपल्या विभागाने कोणत्याही ठोस हालचाली केलेल्या दिसत नाहीत. जनतेची…

Read More

जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे उल्लेखनीय यश…

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी जिल्हास्तरीय तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध बुदधिबळ स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पारितोषिके पटकावली. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि बुदधिबळ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा वर्षे ॲकेडमीच्या शेकडो विदयार्थ्यांनी सातत्याने शालेय आणि असोसिएशनच्या जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.बेळगाव येथील…

Read More

जिल्हा बँकेकडून चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप…?

राजन तेलींचा आरोप:उच्च न्यायालयात तक्रार करण्याचा दिला इशारा.. कणकवली : माजी आमदार राजन तेली यांनी सोमवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेद्वारे जिल्हा बँकेवर आरोप केलेत. जिल्हा बँकेकडून चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केले जात आहे. या प्रकाराला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच काही संचालक जबाबदार आहेत. या सर्व दोषींची…

Read More

ई पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी समिती गठीत…

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का):-राज्यात खरीप हंगाम २०२५ हा दि.०१ ऑगस्ट, २०२५ पासून सुरु झाला होता. त्यांतर्गत दि.०१ ऑगस्ट, २०२५ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच दि.०१ ऑक्टोबर, २०२५ पासून सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात आली होती. राज्यात बऱ्याच जिल्ह्यात उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज इ. लाभापासून कोणताही शेतकरी वंचित…

Read More

श्रद्धेची अखंड परंपरा जपणारा श्री देव दोन गावचा पूर्वस जत्रोत्सव उत्साहात साजरा…

सावंतवाडी : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावच्या श्रद्धेची अखंड परंपरा जपणारा मळगाव येथील जागृत दैवत श्री देव दोन गावचा पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या लक्षणीय गर्दीत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणेच श्री देव दोन गावचा पूर्वस हे मळगाव व सोनुर्ली या दोन्ही गावांचे आराध्य दैवत आहे….

Read More

ॲड राजीव बिले यांना कोकणरत्न पदवी प्रदान…

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे प्रख्यात वकील ॲड राजीव दत्ताराम बिले यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत कोकणरत्न पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. हा पदवीप्रदान सोहळा मुंबई येथील आझाद मैदान मराठी पत्रकार भवन येथे संपन्न झाला.यावेळी स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे, वरिष्ठ पत्रकार व संपादक सचिन कळझुनकर, मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर,युवानेते सचिन गावडे, खजिनदार राजेंद्र…

Read More

कणकवलीत युवती मृत्यू प्रकरणी परस्पर गुन्हे दाखल…?

50 पेक्षा जास्त लोकांवर झाले गुन्हा दाखल:गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून कमालीची गुप्तता.. ⚡कणकवली ता.१५-: तालुक्यातील युवतीच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी मृत युवतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन डॉक्टरांवर, तर रुग्णालयाचे संचालक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ४० ते ५० जणांविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या…

Read More
You cannot copy content of this page