दांडी येथे जाळ्यात अडकलेल्या घारीला जीवदान…

⚡मालवण ता.११-:
दांडी येथील दांडेश्वर मंदीर नजीक जाळ्यात अडकलेल्या व उष्णतेमुळे निर्जलीकरण झालेल्या घार (ब्लॅक काईट) पक्षास मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांनी जीवदान दिले.

दांडी येथील दांडेश्वर मंदिरनजीकच्या समुद्र किनाऱ्यालगत जाळ्यात अडकलेला व उष्णतेमुळे निर्जलीकरण अवस्थेत घार हा पक्षी प्रविण कुबल यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पारंपरिक मच्छिमार, पर्यटन व्यवसायीक प्रविण कुबल, रामा धुरत व वरद मोरजकर यांनी घारीची जाळ्यातून सुटका केले. त्यानंतर युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क केला असता अक्षय रेवंडकर व इकोमेट्स संस्थेचे साहिल कुबल त्याठिकाणी पोहोचले. वन विभागास संपर्क करून त्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या घारीस कांदळवन विभाग मालवण कार्यालयामध्ये संस्थेमार्फत सुखरूप सुपूर्द करण्यात आले.

You cannot copy content of this page