⚡सावंतवाडी ता.११-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून रुग्णांच्या सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी अण्णा देसाई प्राध्यापक सुभाष गोवेकर व संस्थेचे सचिव प्रकाश राऊळ यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्याकडून रोख रक्कम 51 हजार 500 रुपये एवढी देणगी देण्यात आली.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जिल्हास्तरावर करत असलेले सेवाभावी कार्य अतिशय उत्कृष्ट आहे याचा अनुभव आम्ही नेहमी घेतो असे ज्येष्ठ नागरिकांकडून संस्थेला गौरवण्यात आले. तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच पाठीशी राहील अशी ग्वाही सामाजिक बांधिल प्रतिष्ठानचे रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिक या संस्थेच्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम राबवले जातात हे देखील प्रेरणादायी कार्य आहे. ज्येष्ठ नागरिक तरुणांप्रमाणे सेवाभावी कार्य मनमोकळ्या मनाने या शहरांमध्ये करत आहे यांचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे असे संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या बहुमूल्य अशा सहकार्याबद्दल संस्थेकडून आभार पत्र देण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पावसकर, सचिव प्रकाश राऊळ,उपाध्यक्ष राजेंद्र बिर्जे, सहसचिव श्रीमती विदुल पाटकर, सल्लागार अण्णा देसाई सदस्या मेघना राऊळ व इतर सदस्य त्याचप्रमाणे सावंतवाडीचे पी आय अमोल चव्हाण, सकाळ पेपरचे वितरण अधिकारी गुरुनाथ कदम तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व रूपा मुद्राळे उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या अशा निस्वार्थी सेवाभावी उपक्रमाची दखल ज्येष्ठ नागरिकांकडून घेतली गेली याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी कडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 51 हजार 500 रुपयाची देणगी…
