गुरु तेग बहादूर सिंग यांच्या ३५० शहिदी शताब्दी वर्षानिमित्त आयोजन..
⚡मालवण ता.११-:
श्री गुरु तेग बहादूर सिंग यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने युथ फॉर भारत मालवण तर्फे दि.१४ मार्च रोजी सायंकाळी ४. ३० वा. दैवज्ञ भवन, मालवण येथे ‘शहादत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत देशाच्या हिंदभूमीवर, स्वातंत्र्याच्या स्थन्डीलावर अनेक विरपुरुष, महापुरुष आणि अनामिक हिंदूंनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यामधील एक ज्वलंत नाव म्हणजे शिखांचे नववे गुरु तेग बहादूर सिंग हे होत. दि. २४ नोव्हेंबर १६७५ रोजी धर्म आणि मानवतेच्या कल्याणसाठी त्यांनी बलिदान दिले. हे बलिदान म्हणजे औरंगजेबाने केलेली क्रूर हत्या होती. या बलिदानाने तत्कालीन अखंड हिंदुस्थान ला प्रेरणा दिली व क्रांतीची ज्योत धगधगली. या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत असून या बलिदानचे स्मरण व्हावे, म्हणून भारत सरकारने हे वर्ष शहादत वर्ष म्हणून घोषित केले आहे. दि. १४ मार्च रोजी सर्व मालवणवासिय या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात धामणी संगमेश्वर येथील व्याख्याते व प्रवचनकार श्रीनिवास दिनकर पेंडसे हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
