राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा…

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव..

⚡​सावंतवाडी ता.११-:
राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य, जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘नारीशक्ती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
​या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक माधुरी अनिल मुळीक, हायकोर्ट ॲड. अंजली अमित कुडतरकर, ॲड. अनघा अनिल निरवडेकर, सामाजिक कार्यकर्त्या श्रेया सुधीर आडीवरेकर, ॲड. सायली काशिनाथ दुभाषी आणि सामाजिक कार्यकर्त्या निकिता नारायण सावंत उपस्थित होत्या.
​ उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर कसे उभे राहावे, समाजात वावरताना स्वतःची ओळख कशी निर्माण करावी, याची सविस्तर माहिती पाहुण्यांनी दिली. तसेच सर्व उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

​नारीशक्ती पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वाटप
यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सुरेखा गणपती दळवी, लक्ष्मी लक्ष्मण माळकर, अनिता अशोक मठकर, लक्ष्मी विष्णू काळसेकर, विलासिनी नाईक आणि सावित्री तानाजी माळकर या महिलांना त्यांच्या कार्याची दखल घेत ‘नारीशक्ती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच MCED काथ्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकी ग्रुपमधील महिलांनाही ‘नारीशक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवाजी तळवणेकर, सहसचिव कल्याण कदम, जिल्हा प्रवक्ते डॉक्टर रमाकांत गावडे, महिला जिल्हाध्यक्ष अंकिता माळकर, जिल्हा उपाध्यक्ष पुजा सोनसुरकर, चित्रपट सेना जिल्हाध्यक्ष गजेंद्र कोठावळे, चित्रपट सेना महिला अध्यक्षा प्राजक्ता मोरजकर, जिल्हा तालुकाध्यक्ष संचिता गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
​तसेच सावंतवाडी शहराध्यक्षा सेजल पेडणेकर, उपाध्यक्षा अक्षता कुडतरकर, सदस्य दिप्ती कोरगावकर, सुनिता भाईप, सुहासिनी शेट्ये, अश्विनी कुडतरकर, दिशा राऊळ, विजया चव्हाण, शितल माळकर, प्रतिमा माळकर, सुवर्णा माळकर, लक्ष्मी माळकर आणि दिनेश राऊळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page