Headlines

Global Maharashtra Breaking News

भेडल्या माडाची तोड थांबवून झाडाची शेड्युल ट्री म्हणून नोंद करा

भाजपा शहर महिला कमिटीची वनविभागाकडे मागणी सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेडला माडाची बेसुमार तोड होत असून, या झाडाची होणारी ही कत्तल व होणारी तस्करी त्वरित थांबविण्यात यावी अशी मागणी भाजप शहर महिला कमिटीने वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या झाडांची तोड करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील केली…

Read Full News

*माजी नगराध्यक्ष कै. लीलाधर हडकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृतीलीला विशेषांकाचे होणार प्रकाशन

*क्रिकेट, बॅडमिंटन आणि हॉलीबॉल स्पर्धेचे देखील करण्यात येणार आयोजन;स्पोर्ट्स असोसिएशन च्या बैठकीत निर्णय *💫मालवण दि.१०-:* क्रिकेटसह अन्य क्रीडा प्रकारांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेल्या मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक, कर्णधार तथा मालवणचे माजी नगराध्यक्ष कै. लीलाधर हडकर यांच्या प्रथम स्मृतिदिन प्रित्यर्थ मालवण येथे क्रिकेट, बॅडमिंटन आणि हॉलीबॉल या खेळांच्या सामन्यांचे आयोजन तसेच ‘स्मृतिलीला’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्याचा निर्णय मालवण…

Read Full News

चव्हाण, चोपडेकर, सावंत पैठणीच्या मानकरी….

मालवण पंचायत समिती येथे विविध स्पर्धा संपन्न *💫मालवण दि.१०-:* मालवण पंचायत समिती येथे महिला दिनानिमित्त एक दिवस कामकाजाविना या संकल्पने अंतर्गत आयोजित खेळ पैठणीचा व वेशभूषा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या खेळ पैठणीचा स्पर्धेत ए.के. चव्हाण, मधुरा चोपडेकर, साक्षी सावंत यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. कोरोना खबरदारी नियमांचे पालन करून पार पडलेल्या या…

Read Full News

पंधरा दिवसात मच्छीमारांना मदतीचे वाटप करण्यात यावे…

*काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी_ *💫मालवण दि.१०-:* वादळग्रस्त मच्छीमारांना आर्थिक साहाय्य म्हणून मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर केली आहे. या मदतीच्या निधीचे येत्या १५ दिवसात मच्छीमारांना वाटप करावे अशी मागणी मालवण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मत्स्य विभागाकडे केली आहे. क्यार व महा चक्रीवादळातील ग्रस्त मच्छीमारांना आर्थिक सहाय्य म्हणून मत्स्यव्यवसाय व…

Read Full News

गुटखा विक्री प्रकरणी तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी

सावंतवाडी-: गुटखा विक्री केल्याप्रकरणी अन्न व भेसळ विभागाने ताब्यात घेतलेल्या तीन संशयित आरोपींना आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी सरकारी पक्षाकडून अँड. परमार यांनी काम पाहिले आहे तर संस्थेतर्फे सूहेब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

आम. नाईक यांनी मत्स्य पॅकेजमधील त्रुटी दूर करून नंतरच श्रेयाचे राजकारण करावे-:बाबा मोंडकर…

*💫मालवण दि.१०-:* क्यार व अन्य वादळ सदृश्य स्थितीमध्ये राज्यसरकार मार्फत मच्छीमाराना मंजूर झालेल्या सानूग्रह अनुदानातील सर्व त्रुटी दूर कराव्यात आणि नंतरच आमदार वैभव नाईक यांनी श्रेयाचे राजकारण करावे असे टीकात्मक आवाहन भाजपचे जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे. क्यार व महाचक्रीवादळग्रस्त व नंतर आलेला कोरोना व्हायरस मुळे जिल्ह्यातील २५००० पेक्षा जास्त मच्छीमार कुटुंब…

Read Full News

मच्छीमार कुटुंबातील प्रत्येक क्रियाशील सदस्याला मत्स्य पॅकेजचा लाभ…

राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी घेतला निर्णय : मच्छिमार नेते तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मानले आभार_ *💫मालवण दि.१०-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मच्छीमार कुटुंबातील प्रत्येक क्रियाशील सदस्याला मत्स्य पॅकेजचा लाभ देण्याचा निर्णय राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी घेतला आहे. त्यामुळे समस्त मच्छिमारांच्यावतीने आपण आमदार वैभव नाईक यांच्यासह मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम…

Read Full News

*गुटखा वाहतूक प्रकरणी संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ*

सावंतवाडी-: बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपींना आज पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायलयाने पुन्हा एकदा त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ केली असून, सोमवार दिनांक १५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read Full News

खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस शिवसेनेच्या वतीने ‘आरोग्य सन्मान दिवस’ म्हणून होणार साजरा

*जिल्हा बँक अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतिश सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सिंधूदुर्गनगरी दि.१०-:* रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांचा १५ मार्च हा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने ‘ आरोग्य सन्मान दिवस ‘ म्हणून साजरा केला जाणार आहे. यावेळी कोरोना काळात चांगले काम केलेल्या व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले जाणार आहे….

Read Full News

*सावंतवाडी शहरातील पोल्ट्री व्यवसायिकाचा विहिरीत बुडून मृत्यू

*💫सावंतवाडी दि.१०-:* शहरात पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. मोजेस अँटोनी डिसिल्वा वय ५३, रा. चराठा) असे त्या व्यापाऱ्यांचे नाव असून, चराठे कारीवडे मार्गावरील त्यांच्या बागेतील विहिरीत पडून त्यांच्या मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून,पंचनामा सुरू आहे. गेली अनेक वर्ष…

Read Full News

You cannot copy content of this page