⚡वैभववाडी ता.०२-: पंचायत समिती वैभववाडी यांच्या वतीने सेवा संकल्प अभियान सेवा संकल्प दौड २०२६ चे उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून सभापती सिद्धेश रावराणे व तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले.
पंचायत समिती वैभववाडी ”स्वच्छ भारत समृद्ध भारत” पदाधिकारी • अधिकारी • कर्मचारी यांच्या एकजुटतेच्या आणि सामूहिक सहभागातून स्वच्छता • सेवा • आरोग्य • एकता यांचा प्रेरणादायी संदेश देणारी सेवा दौड “चला, एकत्र धावूया…
सेवेचा संकल्प अधिक बळकट करूया!”
सेवा हीच खरी साधना • जनसेवा हीच खरी बांधिलकी पंचायत समिती, वैभववाडी. त्यांच्या वतीने सेवा संकल्प दौड वैभववाडीत राबवण्यात आले. यावेळी जि प सदस्य प्रमोद रावराणे नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे प स सदस्य देवानंद पालांडे पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर गटविकास अधिकारी प्रितेश वाघ सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती माने ग्राम विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर गटशिक्षणाधिकारी थोरात केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव विजय केळकर गणपत देसाई संतोष टक्के सर्व प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख सर्व ग्रामसेवक पंचायत समिती अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छता, सेवा, आरोग्याचा दिला संदेश..
